लेथ मशिनचा अपहार करणाऱ्या तिघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पिंपरी - लेथ मशिन वापरून परत देतो, असे सांगून तिचा परस्पर अपहार केला. या प्रकरणी तिघांवर एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी - लेथ मशिन वापरून परत देतो, असे सांगून तिचा परस्पर अपहार केला. या प्रकरणी तिघांवर एमआयडीसी-भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सुरेश मणिराम यादव (वय 40), ब्रीजबाला सुरेश यादव (वय 35) आणि राकेश मणिराम यादव (वय 30, तिघेही रा. गंधर्वनगरी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अर्जुन रामपलट यादव (वय 28, रा. सोनावणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ब्रीजबाला या फिर्यादी यांच्या बहीण असून सुरेश हे दाजी आणि राकेश हे दाजींचे छोटे बंधू आहेत. 22 मे ते 25 सप्टेंबर या कालावधीत अर्जुन हे गावी गेले होते. तेव्हा आरोपींनी संगनमत करून तीन लाख 80 हजार रुपयांच्या दोन लेथ मशिन वापरण्यासाठी नेतो आणि परत आणून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून नेल्या. मात्र, त्या परत मागण्यासाठी गेल्या, तेव्हा त्या दिल्या नाहीत. तपास सहायक निरीक्षक राजू ठुबल करीत आहेत. 

Web Title: crime on the three person of leth machine fraud

टॅग्स