वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे अखेर 'ती बोलेरो' पकडली

हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मोठं रॅकेट उघडकीस येणार?
crime traffic police finally caught Bolero Transport of liquor case registered Haveli police station pune
crime traffic police finally caught Bolero Transport of liquor case registered Haveli police station punesakal

किरकटवाडी: एक बोलेरो गाडी दररोज सिंहगड रस्त्याने पुढे डोणजे, खानापूर, पानशेत या भागात जात होती. सदर गाडीतून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते, मात्र गाडीवर कारवाई होत नव्हती. आज अखेर हवेली पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल मकसूद सय्यद यांच्या सतर्कतेमुळे ही गाडी मद्याच्या बाटल्यांच्या बॉक्ससह पकडण्यात आली असून गाडी जप्त करण्यात आली आहे व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल मकसूद सय्यद हे खडकवासला धरण चौकाच्या पुढे दैनंदिन कर्तव्य बजावत असताना संशय आल्याने त्यांनी सदर गाडी अडवली. चालकाला गाडीत काय आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सय्यद यांनी गाडी तपासली असता त्यात मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. सय्यद यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी सनदी अधिकारी तेगबीरसिंग संधु यांना कळवले व त्यांच्या सुचनेनुसार चालकाला गाडी हवेली पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितली. याप्रकरणी विजय भिमराव राठोड (वय 23, रा. नऱ्हेगाव ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मद्द्याचे बॉक्स व बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे.

हवेली पोलीस रॅकेट उघडकीस आणणार का?

ही गाडी दररोज मद्द्याचे बॉक्स भरुन राजरोसपणे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असताना आजपर्यंत कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कशी दिसली नाही याबाबतचा प्रश्न अनुत्तरित आहे. आता पोलीस ही गाडी कोणाची आहे? कोणकोणत्या ठिकाणी मद्द्य पुरवते?मद्य बनावट असते का? अशा अनेक अंगाने तपास करुन हे रॅकेट उघडकीस आणणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यामागे एका पोलीस अधिकाऱ्याचा हात?

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या हॉटेल व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे मद्द्य पुरवठा करण्याचा हा 'धंदा' एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा असल्याची माहिती मिळत आहे. पकडलेली गाडी सोडण्यासाठी त्या अधिकाऱ्याची काही माणसं पोलीस ठाण्याशी संपर्क करत असल्याचे कळत आहे, मात्र सनदी अधिकारी तेगबीरसिंग संधु यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तडजोड शक्य नसल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधिकारी असो नाहीतर आणखी कोणी असो चौकशीतून सर्वकाही समोर येईल असे प्रभारी अधिकारी संधु यांनी सांगितले.

गाडीत दारुच आहे कशावरून म्हणायचे?

काही दिवसांपूर्वी खडकवासला येथील तरुणांनी सदर गाडीचा फोटो काढून पोलीसांना दिला होता. काळ्या रंगाच्या चादरीखाली झाकलेले मद्द्याचे बॉक्स स्पष्ट दिसत होते, मात्र त्यावेळी पोलीसांनी गाडीत दारुच आहे असे कशावरून म्हणायचे? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यामुळे पोलीस जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या तरुणांनी केला होता. आज मात्र वाहतूक पोलीस मकसूद सय्यद यांच्या सतर्कतेमुळे त्या गाडीतून बेकायदेशीरपणे मद्द्याची वाहतूक होत होती हे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com