अवैधरीत्या पिस्तुलची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

साडे तीन लाख रुपये किंमतीचे 11 पिस्तुल व 14 जिवंत काडतुसे जप्त
अवैधरीत्या पिस्तुलची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक
अवैधरीत्या पिस्तुलची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक sakal

पुणे : शहरामध्ये अवैधरीत्या पिस्तुलची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराससह चौघांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून साडे तीन लाख रुपये किंमतीचे तब्बल 11 पिस्तुल व 14 जिवंत काडतुसे जप्त केले. ज्ञानेश्‍वर ऊर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय 21, सध्या रा. शनी शिंगणापुर, नेवासा, मुळ रा.घनसांगवी, जालना), निखील ऊर्फ सनी बाळासाहेब पवार (वय 23, लोणी काळभोर), युवराज बापु गुंड (वय 24, रा. पांडवनगर, वडकी, हवेली), अमोल नवनाथ तांबे (वय 27, रा.राहुरी, नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, वाघोली येथील केसनंद रस्त्यावर 18 एप्रिल रोजी एक तरुण अवैधरीत्या पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे तीन पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने ते पिस्तुल विक्री करण्यासाठी आणले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करुन त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्याने निखिल पवार, युवराज गुंड, अमोल तांबे यांना पिस्तुल विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी त्या तिघांकडे चौकशी करुन तपास केला. तेव्हा निखिल पवार याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस, तांबे याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. तसेच डुके याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी त्याच्या घरातुन तीन पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. असे चौघांकडून 11 पिस्तुल व 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या चौकशीमध्ये डुकरे हा मध्य प्रदेशातील उज्जैन येथून शंकर नायक नावाच्या आरोपीकडून पिस्तुल खरेदी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com