पर्यटकांनो, मुळशीत येऊ नका! कारण...

Crimes filed against 90 people for Breaking lockdown rules
Crimes filed against 90 people for Breaking lockdown rules

पिरंगुट : लॅाकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पौड पोलिसांनी रविवारी ९० जणांवर गुन्हे दाखल केले. मुळशी तालुक्यात विना मास्क फिरणारे तसेच शहरातून मुळशीत पर्यटनास आलल्याे पर्यटकांवर ही कारवाई केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने पौड पोलिसांनीच आता कडक पावले उचलली आहेत. लॅाकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि मोकाट फिरणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे, गर्दी करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे आदी वर्तनांबद्दल आता थेट गुन्हे दाखल करायला सुरवात केली आहे.

होय, मला कोरोना झालाय. तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच बरा होईल! 

याबाबत अशोक धुमाळ म्हणाले, ''जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुळशी तालुक्यात पर्यटनास व विना मास्क फिरण्यास बंदी असताना पुणे शहरातून पर्यटनास अनेक पर्यटक आले होते. त्या सर्वांवर तसेच तालुक्यातील चहाच्या टपरीवाले व वडापाव सेंटरवर अशा ९०-९५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पर्यटनाला बंदी असल्याने पुणे शहरातील पर्यटकांनी तसेच अन्य ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांनी मुळशीत येऊ नये. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाणार आहे.''

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

''मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे संचारबंदी प्रभावी राबविण्यासाठी भूगाव , घोटावडे फाटा व पौड येथे नाकाबंदी सुरू केली आहे. कोळवण, मुळशी, घोटावडे, पिरंगुट, मुठा, लवासा, ताम्हिणी आदी भागात रात्रंदिवस गस्त सुरू केलेली आहे. सूचना देऊनही अनावश्यकरित्या वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना आढळतात. अनेकजण मास्क न घालता फिरतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम चालू आहे. कोरोना थांबविण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असून, प्रत्येकाने स्वयंशिस्त राखली पाहिजे.''
- अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पौड

फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com