पोलिस भरती परीक्षेत तोतया उमेदवारांविरूध्द गुन्हा दाखल

राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या भरती परीक्षेत बनावट ओळखपत्रासह तोतया उमेदवार उभा केल्याप्रकरणी दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SRPF
SRPFSakal
Summary

राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या भरती परीक्षेत बनावट ओळखपत्रासह तोतया उमेदवार उभा केल्याप्रकरणी दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड - राज्य राखीव पोलिस दलाच्या (State Reserve Police Force) सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या भरती (Recruitment) परीक्षेत बनावट ओळखपत्रासह तोतया उमेदवार (Bogus Candidate) उभा केल्याप्रकरणी दोन तरूणांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. भरती अंतर्गत मैदानी चाचणी परीक्षेकरिता हा उमेदवार उभा करण्यात आला होता.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) पोलिस भरतीसाठी अर्ज करणारा संदिप रामू राजपूत ( रा. लालवण, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) हा परीक्षार्थी आणि त्याचा अज्ञात तोतया परीक्षार्थी साथीदार, असे दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

SRPF
पुणे : विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं उद्या होणार नाही अनावरण!

दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक सात येथील मैदानावर कुसडगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील एसआरपीएफ गट क्रमांक एकोणीस करिता सुरू असलेल्या पोलिस भरती अंतर्गत मैदानी चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला. संदिप राजपूत व त्याच्या साथीदाराने भरती अर्जावर आणि मैदानी चाचणी ओळखपत्रावर दोन वेगळे छायाचित्र लावले आणि बनावट स्वाक्षरी केली होती. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर दौंड पोलिस ठाण्यात याप्रकरी एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक महेंद्र कोरे यांनी फिर्याद दाखल केली .

फिर्यादीनुसार संदिप राजपूत व त्याच्या अज्ञात साथीविरूध्द शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक निरीक्षक तुकाराम राठोड पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com