पोलिस कोठडीतून पळालेल्या मोक्काच्या आरोपीस अटक

पोलिसांच्या वेशात टाकला होता ज्वेलर्सच्या दुकानात दिवसाढवळ्या दरोडा

Criminal arrest
Criminal arrestSakal Media

भोर ः येथील पोलिस कोठडीचे लोखंडी गज कापून पळून गेलेल्या मोक्का गुह्यातील दोन आरोपींपैकी एकास स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. १५) दुपारी पकडले. चंद्रकांत लोखंडे (वय ३२, रा. ढवळ, ता. फलटण. जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून १७ फेब्रुवारीला तो प्रवीण राऊत या साथीदारासोबत पोलिस कोठडीचे गज कापून पलायन केले होते. त्यांनी पोलिसांच्या वेशात कापूरव्होळ (ता.भोर) येथील ज्वेलर्सच्या दुकानात दिवसाढवळ्या दरोडा टाकला होता.


Criminal arrest
पुण्याच्या ग्रामीण भागात होतेय कांदा बियाणांची चोरी

चंद्रकांत लोखंडे हा मुंबईहून कर्नाटकला खासगी ट्रॅव्हल बसमधून निघाला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून खेड-शिवापूर येथे गाडी थांबवून त्यास अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यास राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


Criminal arrest
वरवंड येथील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे पोसई, रामेश्वर धोंडगे पोना, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे व प्रसन्नजित घाडगे यांनी ही कामगीरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com