मौजमजेसाठी गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मौजमजेसाठी करण्यासाठी गांजा विक्री करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. तिघांकडून एक लाख 56 हजार रुपये किंमतीचा पाच किलो वजनाचा गांजा जप्त केला. धनकवडी येथील तळजाई पठारावर सोमवारी येथे ही कारवाई करण्यात आली.

पुणे - मौजमजेसाठी करण्यासाठी गांजा विक्री करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. तिघांकडून एक लाख 56 हजार रुपये किंमतीचा पाच किलो वजनाचा गांजा जप्त केला. धनकवडी येथील तळजाई पठारावर सोमवारी येथे ही कारवाई करण्यात आली. 

सौरभ सुनील मुंढे (रा.तिरुपतीनगर, धनकवडी), शुभम राजकुमार हवा (रा. एलआयसी कॉलनी बाह्यवळण, मंत्रीनगर, लातूर) व ओम देवराम अत्राम (रा. घोटी, किनवट, नांदेड ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमंली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विजय टिकोळे, पोलिस उपनिरीक्षक हेमंत ढोले व त्यांचे पथक सोमवारी रात्री सहकारनगर परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी धनकवडी येथील तळजाई पठार येथेअ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची खबर त्यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या पथकाने तिरीपती नगर येथून सौरभ मुंडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा हजार रुपयांचा 512 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी शुभम हवा व ओम अत्राम हे दोघेजण त्याचे साथीदार असून ते स्वारगेट एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबले असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने स्वारगेट येथे सापळा लावून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातुन 4 किलो 603 ग्रॅम गांजा, असा तिघांकडून एक लाख 56 हजार रुपये किंमतीचा 5 किलो गांजा जप्त केला. तिघांविरुद्ध सहकार नगर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ बाळगणे व त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, तिघेही गावाकडून गांजा शहरामध्ये आणून त्याची विक्री करीत होते. त्यातुन मिळणाऱ्या पैशातुन मौजमजा करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक टिकोळे, पोलिस उपनिरीक्षक ढोले यांच्यासह पोलिस दिलीप जोशी, अर्जुन दिवेकर, सुशील काकडे, महेंद्र पवार, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal arrested crime