esakal | घरफोड्यांसाठी कर्नाटकमधून पुण्याला येणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal arrested in Pune 38 burglaries detected
  • साडे बारा लाखाचे दागिने जप्त

घरफोड्यांसाठी कर्नाटकमधून पुण्याला येणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे

पुणे : कर्नाटक येथून पुणे व पिंपरी-चिंचवड येथे खास घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी येणाऱ्या एका सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडुन तब्बल साडेबारा लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. तसेच, आरोपीकडून सोने खरेदी करणाऱ्या आटपाडीतील एका सराफी व्यावसायिकालाही अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

विक्रम विठ्ठलसिंग ठाकूर (वय ३२, रा. रूपीनगर, निगडी मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याच्याकडुन सोने खरेदी केल्याप्रकरणी सांगलीतील आटपाडी येथील सराफ व्यावसायिक रामचंद्र मोहिते (वय ३१) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरामध्ये घरफोड्या करणारा पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार विक्रम ठाकूर हा घरफोडी करण्यासाठी कर्नाटकातून पुन्हा पुण्यात येत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलिस कर्मचारी हनुमंत शिंदे, विजयसिंग वसावे, अशोक माने, उमेश काटे व सुभाष पिंगळे यांच्या पथकाने निगडी येथील रूपीनगर भागात सापळा रचून त्यास काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले. 

पोलिसांनी ठाकुरची सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने कात्रज, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, बावधन, रहाटणी, चिखली या भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी पोलिसांनी सांगली जिल्हयातील आटपाडी येथील सराफी व्यावसायिक रामचंद्र मोहिते यास अटक केली. तसेच त्याने काही दागिने हे गुलबर्गा येथील सासू सासऱ्याकडे घरात लपवून ठेवले होते. पोलिसांनी  ठाकूरकडून २६० ग्रॅम सोन्याचे तसेच ५५६ ग्रॅम चांदीच्या दागिन्यासह १२ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाकुर विरुद्ध चोरी व घरफोडीचे तब्बल 38 गुन्हे
विठ्ठल ठाकूर विरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ३८ पेक्षा जास्त चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ठाकुर हा बंद घरे व सदनिकांची रेकी करीत. त्यानंतर रात्री दारू पिऊन संबंधीत घरांच्या ठिकाणी जात असे. हातातील धातुच्या कड्यात लपविलेल्या छोट्या शस्त्रद्वारे घरांची कुलुपे तोडून तो घरफोड्या करत असे.

loading image