दोनशे बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल 

Drunk And drive
Drunk And drive

पुणे : नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या सुमारे 200 जणांवर वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांत गुन्हे दाखल केले. कारवाईची थंडावलेली मोहीम पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. 
पुण्यात वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहनचालकही जबाबदार आहेत, चुकीच्या ठिकाणी यू टर्न घेणे, नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने चारचाकी, दुचाकी चालविल्यामुळे रोज अनेक छोटो मोठे अपघात होतात. शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात नियमांचे उल्लंघन करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला जात आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नो- एंट्रीत गाडी घुसविणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर मोठी कारवाई केल्याने चालकांना धडकी भरली होती. दरम्यान, हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कारवाईचा जोर वाढल्यानंतर बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई थंडावली होती. 

वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहराच्या विरुद्ध दिशेने गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या कारवाईत 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चालकांनी नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त देशमुख यांनी केले. 

गुन्हा कसा होतो? 
विरुद्ध दिशेने गाडी चालविण्याचे प्रकार किरकोळ वाटत असलो तरी यामुळे इतरांच्या जिवाला धोका निर्माण होतो. भारतीय दंड विधान 279 नुसार हयगयीने व अविचाराने वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणे हा गुन्हा आहे, अशी तरतूद आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होतो. यामध्ये सहा महिने कैद किंवा एक हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. या गुन्ह्यात पोलिसांकडून अवघ्या दोन ते तीन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com