पुणे - भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांच्यावर तोडफोडीचा गुन्हा 

संदीप घिसे 
सोमवार, 4 जून 2018

पिंपरी (पुणे) : भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यासह सात जणांवर दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (ता.3) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली आहे. 

पिंपरी (पुणे) : भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यासह सात जणांवर दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (ता.3) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली आहे. 

संजय नेवाळे, सचिन किरवे, स्वप्नील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) व इतर चार अनोळखी व्यक्‍ती अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बदाराम भिकाजी देवासी (वय 24, रा. चेरी स्वीट मार्ट, शिवतेजनगर, चिखली. मूळगाव पाली, राजस्थान) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी हे चेरी स्वीट मार्टमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांच्या दुकानासमोर चायनीज, ज्यूस आणि पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे.

रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास नेवाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. त्यांनी देवासी यांना चायनीज, पाणीपुरी आणि ज्यूस सेंटर हे दुकानासमोर लावायचे नाही, असे सांगितले. यामुळे देवासी यांनी मालकाला फोन करून नेवाळे यांचा निरोप राजस्थानी भाषेत सांगत होते. त्यावेळी नेवाळे यांच्यासोबत आलेली व्यक्‍ती बाजूला उभी होती. त्याने देवासी यांच्या दोन-तीन कानाखाली मारल्या आणि नेवाळे यांना "हा तुमच्याबाबत काय सांगतोय बघा, असे म्हणाला. त्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत दुकानाची तोडफोड केली. या मारहाणीत गळ्यातील चेन आणि कानातील सोन्याची बाळी पडून नुकसान झाले. हा प्रकार सीसी कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या वायरिंगचीही तोडफोड केली.

Web Title: criminal crime filed against bjp corporator sanjay newale