घरफोड्या करणाऱ्या सराईत महिलेस अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

323 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अर्धा किलो चांदी जप्त 
पुणे - उच्चभ्रू सोसायट्यांमधील घरांवर नजर ठेवून दरवाजा उचकटून दागिने लंपास करणाऱ्या सराईत महिलेस चतू:श्रुंगी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिच्याकडून बाणेर, औंध आणि पाषाण परिसरातील गुन्हे उघडकीस आणून 323 ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी जप्त केल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्त शशिकांत शिंदे (उत्तर विभाग) आणि परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. बस्वराज तेली यांनी बुधवारी दिली. 

लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे (वय 28, रा. नवा रस्ता नाडे, ता. पाटण, जि. सातारा) असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे 26 गुन्हे दाखल आहेत, तर, चतू:श्रुंगी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तिला गतवर्षी घरफोडीच्या एका गुन्ह्यात अटकही झाली होती. ती शहरात घरफोडी केल्यानंतर तिच्या मूळ गावी जाऊन राहत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांना मिळाली. त्यावरून उपायुक्‍त डॉ. तेली आणि सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक ढोमे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उदय शिंगाडे, सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक निरीक्षक संदेश केंजळे, हवालदार बाळासाहेब गायकवाड, कर्मचारी बबन गुंड, अजय गायकवाड, सारस साळवी, स्मिता महाजन आणि सायली शिंदे आदींच्या पथकाने 16 ऑक्‍टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळगावी नाडे येथे जाऊन तिला अटक केली. 

ही महिला सराईत गुन्हेगार असून, बंद घर हेरून दुपारच्या वेळी घराचा कडीकोयंडा उचकटून दागिने चोरी करत असे. ती मुंबई-बंगळूर बाह्यवळण रस्त्याने बाणेर, बालेवाडी परिसरात येऊन घरफोडी केल्यानंतर ती मूळ गावी परत जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
- शशिकांत शिंदे, अतिरिक्‍त आयुक्त

Web Title: criminal wwomen arrested