हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

पावसाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

वालचंदनगर (पुणे) : कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरीवर्ग डबघाईला आला असून कोरोनाच्या संकटामध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाऊस व वाऱ्याने झटका दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.
मार्च महिन्यापासून देशामध्ये लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळाला नसल्यामुळे कवडीमोल दराने शेतमाल विकावा लागला. सध्या ही ग्रामीण भागामध्ये अचानक लॉकडाऊन होत असल्याने शेतमाल कसा विकायचा प्रश्‍न शेतकऱ्यापुढे उभा राहत आहे. यामध्ये रविवारी (ता. ८) रोजी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागाला पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली. जोराचा वारा व पावसामुळे लासुर्णे, जंक्शन, बेलवाडी, सणसर, सकपळवाडी, मानकरवाडी, तावशी, वालचंदनगर,कळंब,निमसाखर, निरवांगी, अंथुर्णे परीसरातील शेतकऱ्यांच्या मका, कडवळ व उस पिके भुईसपाट झाली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब ही गळून पडले आहेत.

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

डाळिंबाची झाडे पडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊननंतर पावसाने शेतकऱ्यांना झोडपले असून शासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात लासुर्णे जवळील नरुटेवस्ती येथील शेतकरी रमेश नरुटे यांनी सांगितले की, माझे दोन एकरवरील मका पीक जोरादार पाऊस व वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage due to rains