खेड-शिवापूरमध्ये  पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने रस्त्यांवरील अनेक मोठ-मोठी होर्डिंग्ज आणि  टपऱ्या उलटून पडल्या; तसेच कांदा आणि आंब्याच्या पिकाचे या पावसाने मोठे नुकसान झाले. 

दुपारी दोनच्या सुमारास या परिसरात आभाळ भरून आले अन्‌ काही वेळातच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. खेड-शिवापूर, शिवरे, वरवे या गावांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या वेळी पावसापेक्षा वारा मोठ्या प्रमाणात होता. या वादळात पुणे-सातारा रस्त्यावरील अनेक होर्डिंग्ज आणि वीस टपऱ्या उलटून पडल्या. होर्डिंग्ज पडून अनेक वाहनांचे नुकसान झाले. खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील छताचे अनेक पत्रे वाऱ्याने उडून गेले; तसेच अनेक विजेचे खांबही कोलमडले. पुणे-सातारा रस्त्यावरील अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते; तर आंबा आणि कांदा पिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले. 

Web Title: Crop damage to Khed and Shivapur due to rain