esakal | पीक विम्याचा मिळणार आधार!
sakal

बोलून बातमी शोधा

crop loan

पीक विम्याचा मिळणार आधार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिली. याबाबत बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी माहिती दिली की, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२१-२२ साठी जाहीर केली आहे.

हेही वाचा: घरकुलांसाठीच्या अनुदानात एक लाख रुपायांची वाढ करू : अजित पवार

या योजनेमध्ये खरिपाची चौदा पिके समाविष्ट असून, तालुकानिहाय व शेतकऱ्यांनी रब्बी, उन्हाळी व खरीप हंगामातदेखील जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पिकांचा पीक विमा काढावा. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती, स्थानिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसानीची भरपाई मिळेल. तरी सर्व शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पिकाचा विमा नियमितपणे काढावा. - वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती

या कारणामुळे निर्णय

बारामती व इंदापूर तालुक्यात २१ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत २५ ते ३५ दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन या तालुक्यातील पीक विमाधारकांना २५ टक्के नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना दिली आहे.

अशी मिळणार रक्कम

इंदापूरातील तूर व सोयाबीन आणि बारामतीतील तूर, भुईमूग व सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कम मिळणार आहे, तसेच इंदापूरमधील सणसर व बारामतीमधल सुपे, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल या महसूल मंडळातील बाजरीचा विमा घेतलेल्यांना ही नुकसानभरपाईची २५ टक्के रक्कम देण्याकरिता अधिसूचना काढली आहे.

loading image
go to top