जिवंतपणी शिवला पिंडाला कावळा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोरेगाव भीमा - पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी पिंडदानाची पद्धत आहे. परंतु डोंगरगाव (ता. हवेली) येथील धोंडिराम पांडुरंग शिंदे (वय ६०) यांनी मात्र देहदानाचा संकल्प करून प्रबोधनासाठी जिवंतपणीच पिंडदान केले. या वेळी पिंडाला कावळा शिवल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करणारे शिंदे यांनी यापूर्वीच देहदानाचा संकल्प केला आहे. या निर्णयाला मुलगा गणेश, मयूर, पुतण्या महेश, बहीण कमल कापसे यांनी पाठिंबा दिला आहे. समाजात अवयवदान व देहदानाचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच पिंडदानाबाबत प्रबोधन व्हावे यासाठी या कार्यक्रम केल्याचे शिंदे कुटुंबीयाने स्पष्ट केले. गुलाबराव जाधव महाराज यांच्या प्रवचनानंतर काकस्पर्शही झाला.

Web Title: Crow touches body alive!