संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
रविवार, 1 जुलै 2018

देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. पहाटे विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा व आरती करण्यात आली.

जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार ता. 01 ला संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थीमुळे लेण्याद्री परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. पहाटे विश्वस्त व भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे उपस्थित होते तसेच दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक व जुन्नर परिसरातून श्रीच्या दर्शनासाठी भाविक येत होते. रविवारच्या सुट्टीमुळे दिवस भर गर्दी होती. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. देवस्थानचे वतीने अल्प दरात महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व रात्री 9.43 वाजता चंद्रोदयाच्या वेळी गिरिजात्मजकाची महाआरती होणार आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Crowd of devotees at shree kshetra lenyandri junnar