जुन्नर येथे अष्टविनायक श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
रविवार, 1 जुलै 2018

पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७ वा व दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८ वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.

जुन्नर - ओझर ता. जुन्नर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे विश्वस्त पांडुरंग जगदाळे, देविदास कवडे, बाळासाहेब कवडे, साहेबराव मांडे, ज्ञानेश्वर कवडे, प्रकाश मांडे, शंकर कवडे, बबन मांडे, ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक केला. नंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७ वा व दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८ वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा. 'श्री' स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, चप्पल स्टँड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन इत्यादी व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी ७ वा नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत ह.भ.प. साईनाथ महाराज गुंजाळ, तेजेवाडी यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. सर्व वारकऱ्यांना अन्नदान गजानन मारुती रवळे यांनी केले. 

पहाटे ५ ते रात्रौ ११ पर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.या शुभमुहूर्तावर ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालय ओझर येथील मुलीच्या स्वच्छता गुहाच्या युनिट चे भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी श्री विघ्नहर विद्या प्रसारक मंडळ,ओझर ,माजी विद्यार्थी संघटना ओझर व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Crowd Of Devotees At shree vighnahar ganpati Junnar