‘अक्षय’ सुवर्णखरेदीसाठी गर्दी

‘अक्षय’ सुवर्णखरेदीसाठी गर्दी

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त. गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असणारा भाव आणि लग्नसराईमुळे सोनेखरेदीसाठी मंगळवारी सराफ बाजारात गर्दी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे सराफांनी सांगितले.

लग्नसराईस सुरवात झाल्याने शुभमुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करण्याला ग्राहकांनी पसंती दिली. महिन्याभरापूर्वी गुढीपाडव्याला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा आज जास्त मागणी असल्याचे विविध सराफांनी सांगितले. 

वेढणी व नाणी घेण्यास पिढीजात सराफांच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

वर्किंग डे असल्यामुळे सकाळी विविध सराफी दुकानांमध्ये तुरळक गर्दी होती. मात्र, दुपारनंतर खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले. अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्यामुळे ऐश्वर्य शाश्‍वत राहते, त्यात वाढ होत राहते, अशी लोकभावना असल्याने सायंकाळनंतर सोनेखरेदीसाठी गर्दी झाली होती. 

मध्यंतरी सोन्याचा प्रतिदहा ग्रॅमचा भाव ३४ हजार रुपयांपर्यंत गेला होता; पण मंगळवारी २३.५ कॅरेटचा (वेढणी) भाव ३१,९२० रुपये होता. भाव काहीसा कमी असण्याबरोबरच चांगला मुहूर्त  असल्याने नागरिकांची पावले सायंकाळी सराफी दालनांकडे वळल्याचे दिसून आले. 

ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत उत्स्फूर्तता होती. लग्नसराई, तुलनेने आज भाव कमी असल्याने दागिने, वेढणी व नाण्यांना मागणी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत १५ ते २० टक्के वाढ दिसली.
- अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स

यंदाची अक्षयतृतीया सराफ बाजारासाठी अतिशय चांगली होती. गेल्या दोन वर्षांत सराफ बाजारात काहीसे मंदीचे वातावरण होते. यंदा मात्र, सोने खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
-फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com