राष्ट्रवादीकडून अपेक्षा वाढल्याने हल्लाबोलला गर्दी

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 9 एप्रिल 2018

सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना त्यांच्या व्यथा, मानसिकता प्रदर्शित करण्यासाठी एक विश्वासनिय जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली असल्याने हल्लाबोल सभेला मोठी गर्दी जमा होत आहे.

वारजे माळवाडी - अच्छे दिन काय बुरे दिन पेक्षा ही अधिक वाईट परिस्थिती नरेंद्र मोदी सरकारमुळे आली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना त्यांच्या व्यथा, मानसिकता प्रदर्शित करण्यासाठी एक विश्वासनिय जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली असल्याने हल्लाबोल सभेला मोठी गर्दी जमा होत आहे. असे मत खासदार व पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. 

खडकवासला, कोथरुड, शिवाजीनगर व पर्वती, या विधानसभा मतदार संघाचा हल्लाबोल मोर्चा वारजे माळवाडी येथे 11 एप्रिल ला होत आहे. त्यानिमित्ताने एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, कुमार गोसावी, दत्ता धनकवडे, दीपक मानकर, काका चव्हाण, रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, सचिन दोडके, नीलेश निकम, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, दीपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, शुक्राचार्य वांजळे, शेखर दांगट, विकास दांगट, अप्पा रेणुसे, बंडू केमसे सुरेश गुजर व आजी माजी नगरसेवक व पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँगेसचे मूळ सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून काम करतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने फक्त शरद पवार यांनी मांडले आहेत. असे सांगून चव्हाण म्हणाल्या, "सर्व देशात आता मोदी सरकार विरोधात एकत्र येत असताना त्यातील प्रमुख स्थान हे शरद पवार यांना दिले जात आहे. हा पवार साहेब यांचा अनुभव सर्वच क्षेत्रात असलेले प्रभुत्व यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे."

फडणवीसांचा पोरकटपणा 
भाजप हा स्वतः स्वतः ला सुसंस्कृत मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून शरद पवार बद्दल वक्तव्य करून सुसंस्कृतपणा दाखवून दिला आहे. आता पर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत पणा जपला आहे. फडणवीस यांचे वक्तव्य हे पोरकटपणाचे आहे. अशी प्रतिक्रिया खासदार व पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd in NCPs Hallabol Agitation