लॉकडाऊन नक्की कशासाठी; पुणेकरांना पडलाय विसर; आज अर्ध पुणे घराबाहेर

महेश जगताप
सोमवार, 13 जुलै 2020

तीन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण शहर लॉकडाऊन होणार आहे, असा आदेश काढला आणि पुन्हा नागरिकांच्या मनात पाल चुकचुकली. आता आपल्याला पुन्हा दहा दिवस घरामध्येच बसून काढावी लागणार हे निश्चित झालं. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर, इतर सेवा बंद असल्याने या वेळेत नागरिकांनी भाजीपाला किराणा इतर वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केली. त्याचबरोबर इतर बँकांमधील आर्थिक व्यवहार, कोणाच्या इतर भेटीगाठी उरकून घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले.

स्वारगेट :  पुणे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले आहेत, त्याला कारण आहे येत्या दहा दिवसात शहरामध्ये लॉकडाऊन होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील दहा दिवस ते घरातच राहणार आहे, पण, पुण्यात आज ज्या प्रमाणात झुंबड उडाली आहे त्यावरुन पुणेकरांना हा लॉकडाऊन कशासाठी केला आहे याचा विसर पडला आहे असे दिसते आहे. किराणा, भाजीपाला इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर प्रंचड गर्दीने केली आहे. यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी लॉकडाऊन का करतोय? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

पुण्यात उद्योग क्षेत्रात कोरोनाचे प्रमाण अगदी नगण्य; 'अशी' घेतायेत काळजी

Image may contain: 1 person, walking, standing and outdoor

तीन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण शहर लॉकडाऊन होणार आहे, असा आदेश काढला आणि पुन्हा नागरिकांच्या मनात पाल चुकचुकली. आता आपल्याला पुन्हा दहा दिवस घरामध्येच बसून काढावी लागणार हे निश्चित झालं. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर, इतर सेवा बंद असल्याने या वेळेत नागरिकांनी भाजीपाला किराणा इतर वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केली. त्याचबरोबर इतर बँकांमधील आर्थिक व्यवहार, कोणाच्या इतर भेटीगाठी उरकून घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले.

पुणेकरांनो, मॅगी, पाणीपुरीचा स्टॉकच संपला

तसं पाहिलं तर पुणेकर या दहा दिवसाच्या लॉकडाऊनसाठी निरुत्साही असलेले दिसून आले. त्यांना हा निर्णय आधी अजिबात पचनी पडलेला नव्हता. त्याचबरोबर अनेक लघुउद्योजक, उद्योगपती, व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, विद्यार्थी वर्ग, यांनीही ही या निर्णयाला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. पण, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना प्रशासनाकडे दुसरा कोणताही उपाय नाही असं म्हणत या लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मूळ हेतूला गर्दी करून नागरिकांनी हरताळ फासू नये अशीच चर्चा सर्व स्तरातून होत आहे .

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

किरकोळ फळ विक्रीवाले व भाजी विक्रते सचिन कुदळे सकाळशी बोलताना ''गेल्या तीन दिवसात आधीच्या तुलनेत तीन पट विक्री वाढली आहे'' असे सांगितले त्यामुळे यावरून आपणाला लक्षात येईल किती नागरिक घराबाहेर पडले . 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd for shopping and bank works in Pune as lockdown is going to happen