बारामतीत पोलिसांकडून सीआरपीएफच्या जवानाला मारहाण(व्हिडिओ)

बारामतीत पोलिसांकडून सीआरपीएफच्या जवानाला मारहाण(व्हिडिओ)

बारामती- तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला.

केवळ मारहाण केली नाही तर अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन बेड्या घालून लॉकअप मध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे .
दरम्यान या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला असून सदर जवानाने पोलीस ठाण्यामध्ये खुर्च्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले.

पुलवामा मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाची परवानगी मागण्यासाठी अशोक इंगवले हे आज बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. मात्र ते दुचाकीवरून ट्रिपल सीट आल्याचे कारण सांगत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेतली असे इंगवले यांनी सांगितले.







ट्रिपल सीट आला म्हणून कारवाई करण्याच्या धमकी देत त्यांना दहा ते बारा पोलिसांनी लॉकअप मध्ये घेऊन बेदम मारहाण केली एवढेच नाही तर त्यांच्या हातात बेड्या घातल्या असा आरोप इंगवले यांनी यावेळी केला.
एका सीआरपीएफच्या जवानांना अशी वागणूक देणे हे अत्यंत अपमानास्पद असून या प्रकरणी आपण कारवाईची मागणी केली असल्याचेही इंगवले यांनी सांगितले .

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला असून इंगवले यांनी पोलिस ठाणे मध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला व त्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.







या संदर्भात आवश्यक ती सीसीटीव्ही फुटेज तपासून यामध्ये कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे गोडसे म्हणाले. दरम्यान यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या घटनेची माहिती मागविली असून तपास सुरू करण्यात आलेला आहे.

दुपारी इंगवले यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आले होते या प्रकरणी बारामती तालुक्यात संतप्त पडसाद उमटले असून पोलिसांवर कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com