एसआरपीएफ भरतीसाठी लेखी परीक्षा पुन्हा होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) ग्रुप 2 आणि नांदेडमधील भरती प्रक्रिया रद्द झाली असून, लेखी परीक्षा पुन्हा होणार आहे. त्याबाबतचे तपशील लवकरच प्रसिद्ध होतील, असे पोलिस प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले. 

एसआरपीएफसाठी पुण्यात ग्रुप 2 मध्ये 83 जागांसाठी सुमारे 4 हजार, तर नांदेडमध्ये 71 जागांसाठी सुमारे 1200 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. नांदेडमधील परीक्षा 31 मार्च रोजी, तर पुण्यातील परीक्षा 22 एप्रिल रोजी झाली होती.

लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कंत्राट एसएसजी कंपनीकडे होते. या कंपनीच्या मदतीने भरती गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याबाबत "एसआरपीएफ'च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण भटकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांचे नाव वापरून प्रवीणने अनेक उमेदवारांची फसवणूक करून सुमारे अडीच कोटी रुपये जमा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

पुण्यातील ग्रुप 2 आणि नांदेडमधील भरतीबाबत पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या तारखा लवकरच भरतीप्रक्रियेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येतील. तसेच, उमेदवारांना एसएमएसद्वारेही त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे भरतीप्रक्रियेचे प्रमुख उपायुक्त योगेश कुमार यांनी सांगितले.

Web Title: CRPF recruitment process in Pune and Nanded canceled