सांस्कृतिक कट्ट्यांवर वारसास्थळांचा इतिहास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - पुण्याच्या वारसास्थळाशी जोडणारी चित्रे... निवांत गप्पा मारण्यासाठीचे कट्टे अन्‌ मन मोहून घेणारी वास्तुरचना...हे अवतरले आहे फर्ग्युसन महाविद्यालयाबाहेर. या ठिकाणी त्या जागांना "सांस्कृतिक कट्टे' असे नाव दिले आहे. या कट्ट्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक-सामाजिक विषयांवर भाष्य करणारी चित्रे आहेत. 

हे कट्टे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेरील पदपथावर बांधण्यात आल्यामुळे त्याला तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार अनंत गाडगीळ यांच्या संकल्पनेतून हे सांस्कृतिक कट्टे आकाराला आले आहेत. त्यांच्या आमदार निधीतून पुणे महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात आला असून, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत हे कट्टे बांधले आहेत. या प्रकल्पाचे उद्‌घाटन उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी गाडगीळ आणि वास्तुविशारद प्रद्युम्न घुगरे उपस्थित होते. 

पुण्याच्या ऐतिहासिक वारसास्थळांची माहिती आणि विविध ज्वलंत विषयांवर भाष्य करणारी चित्रे येथे पाहता येतील. फ्युजन आणि मॉडर्न आर्ट या संकल्पनेवर आधारित बांधकामाशिवाय यात रंगसंगतींची अनोखी रचना केली आहे. 

गाडगीळ म्हणाले, "आमदार फंडातून काही तरी वेगळी संकल्पना राबविण्याचे मनात होते. 15 लाखांच्या निधीतून हे काम साकारण्यात आले आहे. एकाच ठिकाणी पुणेकरांना शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळावी, त्यांना निवांतपणा अनुभवता यावा, सांस्कृतिक जगताशी ते जोडले जावे, यासाठी हे कट्टे उभारले आहेत.''

Web Title: On the cultural history heritage places