पाचशेच्या नव्या नोटेची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे ः पाचशेच्या नव्या नोटा मुंबईत पोचल्या असून, सोमवारी (ता. 21) पुणेकरांना ही नोट पाहायला मिळेल, असे काही बॅंक अधिकारी सांगत आहेत, तर काही बॅंकांचे अधिकारी मात्र पाचशेची नवी नोट केव्हा येईल, याबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाचशेच्या नवीन नोटा पुण्यात कधी येतील आणि रोजच्या चलनात वापरायला मिळतील, अशी उत्सुकताच पुणेकरांना लागली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरित केल्या; पण रोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी सुट्या पैशांची निकड सर्वाधिक आहे. त्यासाठी पाचशेची नवीन नोट दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त असल्याने बॅंकांकडूनही रिझर्व्ह बॅंकेला वारंवार विचारणा करण्यात येत आहे. कारण, नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या, तरीही त्या नोटांचा रोजच्या व्यवहारासाठी फारसा उपयोग होत नाही. परिणामी, दोन हजारांची नोट घेणेच नागरिक नापसंत करत आहेत. जर पाचशेची नवीन नोट आली, तर आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल. यासाठी पुणेकर नव्या नोटेच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे केलेल्या मागणीनुसार काही बॅंकांच्या करन्सी चेस्टला केलेल्या आर्थिक पुरवठ्यात पाचशेच्या नोटांचा पुरवठा केला असल्याचे एका बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत दुसऱ्या बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र खात्रीशीर उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: curiosity of new note of 500