नोटा बदलून मिळाल्याच नाहीत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळतील, या आशेने काही नागरिक शिवाजीनगर येथील रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी बॅंकिंग महाविद्यालयासमोर शुक्रवारी गोळा झाले होते. परंतु येथे रिझर्व्ह बॅंकेची शाखा नसून, केवळ प्रशिक्षण केंद्र असल्याने येथे नोटा बदलून मिळणार नाहीत, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी केंद्र सरकारच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त करीत गोंधळ घातला. 

अनिवासी भारतीय नागरिकांकरिता ३० जून २०१७ पर्यंत जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत आहे. मात्र, जे निवासी भारतीय नागरिक ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान परदेशात होते, त्यांच्यासाठी ३१ मार्च २०१७ ही अंतिम मुदत होती. ३० डिसेंबरपर्यंत अन्य राष्ट्रीयीकृत बॅंका आणि त्यानंतर थेट रिझर्व्ह बॅंकेतूनच नोटा बदलून मिळतील, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. परंतु, काही कारणास्तव नोटा बदलून घेऊ न शकलेल्या नागरिकांनी शिवाजीनगर येथील रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी बॅंकिंग महाविद्यालयासमोर रांग लावली. 

अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी संतप्त नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाहेरगावाहूनही काही नागरिक नोटा बदलून घेण्यासाठी आले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

अनिवासी भारतीय संतोष देशपांडे म्हणाले, ‘‘नोटा बदलून मिळतील, या उद्देशाने आलो होतो; परंतु कोणीच दाद दिली नाही.’’ 

लिंबू सरबत विक्रेत्या नंदा पवार म्हणाल्या, ‘‘आमचे कष्टाचे पैसे आहेत. नोटा बदलून मिळाल्या नाहीत. आता या नोटांचे काय करायचे याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे.’’ 

Web Title: currency are not changed