Pune Rains : 'ही' आहे पुण्यातील सध्याची वाहतूक स्थिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

: पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील काही ओढया नाल्यांना पुर आला आहे तर, काही भागातील स्थानिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कित्येक ठिकाणी झाडपडीच्या आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. कालच्या पावसाने काही भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.

पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील काही ओढया नाल्यांना पुर आला आहे तर, काही भागातील स्थानिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कित्येक ठिकाणी झाडपडीच्या आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. कालच्या पावसाने काही भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकीवरही परिणाम झाला आहे.

पुण्यातील सध्याची वाहतूक स्थिती
- पुणे विद्यापीठ ते शिवाजीनग भागातील वाहतूक संथ गतीने चालू 
- अप्पर (बिबवेवाडी) ते सातारा रस्त्यापर्यंत संपूर्ण वाहतूक कोंडी आहे. वाहतूक धीम्या गतीने सुरू
-  के. के. मार्केटकडे जाणारा रस्ता बंद केल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. या रस्त्यावरील सर्व सिग्नल बंद असून वाहतूक पोलिस नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडत आहेpune
- सिंहगड रस्त्यावर हिंगणे आणि संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहतूकीस अडथळा येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुचाकी चालकांनी वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे

-  सातारा रस्त्यावर पद्मावती परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरु आहे
- धायरी फाटा येथे वाहतूक संथ गतीनेच सुरु आहे
- आंबेगाव बु. भागातील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. 
- सिंहगड रस्त्यावर अभिरुची समोर वाहतूक कोंडी झाली आहे. traffic


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: current transport situation in Pune due to rain