सध्या शिक्षणाचा बाजार - प्रा. सुषमा अंधारे

रमेश मोरे
रविवार, 13 मे 2018

जपान अमेरीका चंद्रावर राहण्याची स्वप्न पाहतेय आणि आमच्या शिक्षण पद्धतीत अजुनही चंद्राला मामा म्हणण्याची शिक्षणपद्धत अवलंबली जात अाहे', असे मत जुनी सांगवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर संयुक्त जयंती महोत्सवात प्रा. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

जुनी सांगवी - 'सध्या बेरोजगारी वाढली आहे. शिक्षणाची डिग्री घेतलेल्या बेरोजगारांना सरकार म्हणतेय पकोडे तळुन स्वतःचा उद्धार करा. जपान अमेरीका चंद्रावर राहण्याची स्वप्न पाहतेय आणि आमच्या शिक्षण पद्धतीत अजुनही चंद्राला मामा म्हणण्याची शिक्षणपद्धत अवलंबली जात अाहे', असे मत जुनी सांगवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर संयुक्त जयंती महोत्सवात प्रा. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या, 'आमच्याच समाजातील काही मंडळींना आमच्या विरोधात उभे करून समाजात फुट पाडण्याचे षडयंत्र काही समाजविघातक शक्ती व त्यांची पिलावळ काम करत आहे. अशा शक्तींना सामाजिक चळवळ त्यांची जागा दाखवेल. कुणीही भ्रमात राहु नये. असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. सध्या वस्ती तिथं शाळा हा नियम धाब्यावर बसवुन सरकार राज्यातील अनेक शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे. यामुळे वंचित कष्टकरी विद्यार्थी यांना शिक्षणाच्या बाजारीकरणाला सामोरे जावे लागणार आहे.' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा हे होते. प्रथम सत्रात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी चमत्कारातून विज्ञान या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चव्हाण सुत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले. तर आभार सुजाता निकाळजे यांनी मानले. अमरसिंह आदियाल,राहुल काकडे, संदिप नितनवरे, गजानन कांबळे, सिद्धार्थ मराडे, विजय माघाडे, राजेंद्र डोनोलिकर आदींनी परिश्रम घेतले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: currently the education system is wrong says pro. sushma andhare