ग्राहकाची फसवणूक केल्यास विकसकावर दखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पुणे - ‘‘विकसकाने फसवणूक केल्यास पोलिस ग्राहकाला दिवाणी स्वरूपाचे प्रकरण म्हणून न्यायालयात पाठवितात; परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकसकाकडून ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकरण असल्यास पोलिसांना त्याबाबत तत्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करावा लागणार आहे,’’ अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांचे कायदेविषयक सल्लागार ॲड. संदीप घाटे यांनी दिली. 

‘लिबर्टी गार्डन विरुद्ध के. टी. ग्रुप व इतर’ या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख काठावाला यांनी विकसकाने ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यास पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ॲड. घाटे यांनी या आदेशाबाबत सविस्तर माहिती दिली.
ॲड. घाटे म्हणाले, ‘‘न्यायमूर्ती काठावाला यांनी २०१६ मध्ये कमलाश्री बिल्डर्स प्रकरणामध्येही याच प्रकारचा आदेश दिला आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी झाल्यास बेकायदा कृत्य करणाऱ्या विकसकांना वचक बसेल.

बहुतांश विकसक आगाऊ रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा नोंदवून न देणे, वेळेवर सदनिकेचा ताबा न देणे अशा पद्धतीने फसवणूक करतात. या आदेशामुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांना तत्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करणे शक्‍य झाले आहे. ‘रेरा’ कायदा व संबंधित आदेशामुळे ‘मोफा’ची अंमलबजावणी झाल्यास फसवणूक झालेल्या ग्राहकांची दिवाणी दाव्याच्या किचकट प्रक्रियेतून सुटका होऊन त्यांना न्याय मिळेल.’’

Web Title: customer cheating crime court