वीजजोडसाठी ग्राहकांची लूट

वीजजोडसाठी ग्राहकांची लूट

पुणे - वैयक्तिक स्वरूपाचे अथवा एखाद्या गृहप्रकल्पासाठी वीजजोड देताना महावितरणकडून आकारण्यात येणारे सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस (सीआरए) नियमानुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र अधिकारी त्याला हरताळ फासत ग्राहकांची लूट करीत आहेत.

महावितरणच्या नियमानुसार, सिंगल फेज कनेक्‍शनसाठी संबंधित ग्राहकाने परवानाधारक विद्युत ठेकेदारामार्फत अर्ज करून त्यासाठी आवश्‍यक ते साहित्य (केबलसह) पुरविण्याची तयारी दर्शविली, तर अशा ग्राहकाकडून ‘सीआरए’च्या १.३ टक्केच रक्‍कम भरून घेणे आवश्‍यक आहे; परंतु अनेकदा संबंधित ग्राहकाकडून निश्‍चित करण्यात आलेले ‘सीआरए’ शुल्क तीन हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरून घेतला जातो. वास्तविक, अशा ग्राहकांकडून तीन हजारांच्या केवळ १.३ टक्केच रक्कम भरून घेणे अपेक्षित आहे; परंतु तसे न करता जीएसटीसह संपूर्ण ‘सीआरए’ची रक्कम भरून देखील ग्राहकांनाच वीजजोडसाठीचे साहित्य आणण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड पडतो; तसेच ग्राहकांनी आणलेले साहित्य कोणत्या गुणवत्तेचे आहे, याची तपासणी न करता त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून अनेकदा केबल जळणे, वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे असे प्रकार घडतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेषत: पर्वती आणि कोथरूड विभागात अशाप्रकारे ग्राहकांची लूट होत आहे. मात्र पद्मावती, शिवाजीनगर विभागात नियमानुसार हे काम चालते. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळ्या प्रकारे ‘सीआरए’ची आकारणी केली जात असल्याचे समोर आले. त्याबाबतची कागदपत्रे ‘सकाळ’कडे उपलब्ध झाली असून, त्यावरून हा प्रकार समोर आला आहे.

वैयक्तिक स्वरूपाचे वीजजोड देताना ‘सीआरए’ शुल्क भरून घेऊन काम करणे अपेक्षित आहे. ग्राहकांना कोणतेही साहित्य आणण्यास सांगणे अपेक्षित नाही; परंतु ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा महावितरणकडून घेतला जात आहे. महावितरणने सर्व विभागीय कार्यालयांत माहिती देणारे फलक लावण्याबाबत आदेश द्यावा.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

सर्व्हिेस कनेक्‍शन चार्जेस निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आकारणी झाली पाहिजे. अशाप्रकारे कुठे आकारणी होत असेल, तर संबंधितांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील.
- सचिन तालेवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com