समस्यांबाबत ग्राहक उदासीन - बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पुणे - सरकारने कितीही कडक कायदे केले तरी बेकायदा कामे करणारे त्यामध्ये पळवाटा काढतात. ग्राहकांच्या हितासाठी सरकार अनेक कायदे करते; पण ग्राहकांच्या समस्यांबाबत ग्राहकच उदासीन असल्याने त्याची अंलबजावणी काटेकोरपणे होत नाही, असे मत यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे म्हणाले, ‘‘सध्या ग्राहक दिन झाला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या हवी तशी ग्राहकांची लूट करत आहेत. याकडे केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे.’’

सध्या ग्राहकांच्या हिताचे कायदे होत असले, तरी त्याची अंलबजावणी योग्य होणे गरजेचे आहे. या वेळी अखिल ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक आणि ग्राहक पंचायतीचे आणि ग्राहक पेठेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी विविध ग्राहक संघटनांनी पालकमंत्र्यांना निवेदने दिली. 

तसेच काही ग्राहकांनी त्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत निवेदन दिले.

ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहकांनीच पुढे यायला हवे. या समस्येबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. फक्त कायदे करून यावर तोडगा निघत नाही.
-गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Customer relieves problems Girish Bapat