ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे - डिझायनर फर्निचर...विविध प्रकारचे किचन अप्लायन्सेस...गृहसजावटीचे वैविध्यपूर्ण साहित्य अन्‌ विद्युत उपकरणांपर्यंत सर्व वस्तूंच्या खरेदीची संधी देणाऱ्या "सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो 2018' ला शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तूंपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत...फर्निचरपासून ते गॅजेट्‌सपर्यंत अशा नानाविध वस्तू एकाच छताखाली लोकांना खरेदी करता आल्या. एक्‍स्पोतील सुमारे शंभर स्टॉलमध्ये लोकांना नावीन्यपूर्ण उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. शनिवार आणि रविवार सुटीचे दोन दिवस असल्याने एक्‍स्पोत काही खास सवलतींचा लाभही लोकांना घेता येईल. 

या एक्‍स्पोमध्ये लोकांना लाइव्ह डेमोसह एक्‍स्चेंज ऑफर्स आणि सवलतींचा लाभ घेता आला. कलाकुसरीच्या वस्तूंसह गृहोपयोगी वस्तूंमध्ये लोकांना वैविध्य पाहायला मिळाले. गॅस शेगड्या, मिक्‍सर अँड ज्युसर, क्रॉकरी, किचन चिमणीज, तंदूर मेकर, आटा चक्की अशा गृहोपयोगी वस्तूंसह लोखंडापासून ते सागवानी लाकडापासून तयार केलेले डिझायनर फर्निचरही पाहता येईल. फुलदाणी, विविध प्रकारच्या मूर्ती, आर्टिफिशल फुले, फ्रेम्स आणि पेंटिग्जपर्यंत, विविधांगी गृहसजावटीचे पर्याय एक्‍स्पोत उपलब्ध आहेत. 

तसेच महिला-युवतींसाठी कपडे, फूटवेअर, सौंदर्य प्रसाधने या वस्तूंसह पुरुषांसाठी कपडे, फूटवेअर, सनग्लासेस आणि परफ्युमचे अनेक पर्यायही येथे आहेत. खाद्यपदार्थांमध्ये अनेक व्हरायटीज खवय्यांसाठी पाहता येतील. मिठाईपासून ते विविध प्रकारच्या मसाल्यापर्यंत अनेक पर्याय येथे पाहायला मिळणार आहे. नामवंत कंपन्यांच्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठीचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता.26) खुला आहे. 

कालावधी - रविवारपर्यंत (ता. 26) 
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ 
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
सुविधा - प्रवेश विनामूल्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com