पेट भरके खाओ! फूडऍपवर सुरू सवलतींची खैरात 

Uber-Eat-Swiggi-Zomato.jpg
Uber-Eat-Swiggi-Zomato.jpg

पुणे : फूड अॅप कंपन्यांमधील वाढत असलेली स्पर्धा ग्राहकांच्या पथ्यावर पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे एका ऑर्डरवर दुसरी ऑर्डर फ्री इथपासून ते पहिल्या ऑर्डरला चक्क 50 टक्के डिस्काऊंट देण्याचीही ऑफर या कंपन्या देत आहेत. त्यामुळे ग्राहक 'पेट भरके' खात असून विविध प्रकारच्या डिशही ट्राय करू लागले आहेत. 

झोमॅटो, स्विग्गी, उबेर इट आदी अनेक फूड अॅप कंपन्या आता ग्राहकांच्या दारापर्यंत पोचल्या आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहक आकर्षित करण्यासाठी ते नव्या- नव्या ऑफर्सही देत आहेत. त्यामुळे दिवाळी फराळावर ताव मारीत असलेल्या ग्राहकांना शहरातील विविध हॉटेलमधील चविस्ट खाद्यपदार्थाची अगदी घरी बसल्या कमी किमतीत चव चाखता येत आहे. अॅप्लिकेशन डाऊनलोड करून किंवा संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर स्विग्गी पहिल्या ऑर्डरवर तब्बल 50 टक्के सवलत देत आहे. तर झोमॅटोने गोल्ड मेंबरशीपही लोकप्रिय झाली आहे. ही मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना झोमॅटो एका डिशवर दुसरी डिश मोफत देत आहे. या सर्वांत उबेर इट देखील मागे नाही. प्रमो कोडच्या माध्यमातून उबेर इट अनेक डिशवर 30 ते 50 टक्केपर्यंत सवलत देत आहे. या ऑफरमुळे ऑर्डर करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अॅपवरून फूड मागविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील आयटी कंपन्या असलेल्या परिसरासह शहराच्या मध्य वस्ती व उपनगरांतून दररोज हजारो ऑर्डर केल्या जात आहेत. 

फूड अॅप नियमितपणे वापरणारे सुदेश खर्डे या ऑफर्सबाबत म्हणाले की, "मी अनेक दिवसांपासून अॅपद्वारे फूड मागवीत आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी चांगली ऑफर आहे याच्या नेहमी शोधात असतो. सध्या सुरू असलेल्या ऑफरमुळे कमी किमतीत जेवण मिळत आहे. 

अॅपवरून ऑर्डर दिल्यानंतर ऑफीस किंवा घरी बसल्याबसल्या अगदी त्वरित फूड मिळते. जी डिश हॉटेलमध्ये 150 रुपयांना आहे तीच अॅपवर 100 ते 120 रुपयांना मिळते. त्यामुळे मी नेहमी अॅपद्वारेच ऑर्डर करतो. 
- नितीन काळे, आयटीयन 

हॉटेलमध्ये येऊन जेवण करण्यापेक्षा अॅपद्वारे ऑर्डर करण्यावरच ग्राहकांचा भर आहे. कारण त्यांना त्याठिकाणी कमी किमतीत पदार्थ मिळत आहे. ऑफर असल्या की ऑर्डरचे प्रमाण देखील आपोआप वाढते. 
- जगदीश साळे, हॉटेल व्यावसायिक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com