सीमा शुल्क विभागाने केले ३८ लाखांचे विदेशी चलन जप्त

custom department
custom department

पुणे - विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने लोहगाव विमानतळावर ताब्यात घेतले. दोघांकडून  ३८ लाख ७९ हजार रुपयांचे पौंड, कतार रियाल व सौदी रियाल या स्वरूपाचे विदेशी चलन जप्त करण्यात आले.  

अन्सारी फिरोज अब्दुल हमीद (वय ४३, रा. गुरुवार पेठ) व शेख मोहम्मद तारिक इक्‍बाल अहमद (वय ३३, कसबा पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सीमा शुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी व शेख हे दोघेही पुण्यातील रहिवासी आहेत. दोघेजण विमानाने दुबईहून पुण्याला आले. त्यानंतर अन्य प्रवाशांप्रमाणेच सीमा शुल्क विभागाच्या पथकाकडून त्या दोघांचीही तपासणी केली जात होती. त्या वेळी दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी कपड्यांच्या आतमध्ये विदेशी चलन लपवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये पौंड, कतार रियाल व सौदी रियाल असे विदेशी चलन आढळले. या चलनाची भारतीय चलनानुसार ३८ लाख ७९ हजार इतकी किंमत होते.

पथकाने त्यांना अटक केली. त्यांनी यापूर्वी विदेशी चलनाची तस्करी केली होती का, विदेशी चलन ते कोणाला देणार होते, याचा तपास पथकाकडून केला जात आहे. अशा पद्धतीने विदेशी चलनाची तस्करी होत असल्यास माहिती कळवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com