Video :...तर कपल ऐवजी खपल चॅलेंज होईल; सायबर पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा 

couple.jpg
couple.jpg

पुणे : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या 'कपल चॅलेंज'ने भलताच धुमाकूळ घातलाय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

;

मात्र, सोशल मीडियावर टाकलेले फोटो चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर यातून फसवणूक होऊ शकते. अशा प्रकारचे कुठलेही चॅलेंज स्वीकारताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा पुणे सायबर पोलिसांनी ट्विटरद्वारे दिला आहे. कपल चॅलेंजवाल्यांना क्रिमिनलने चॅलेंज केले तर कपल चॅलेंजचे खपल चॅलेंज होईल. त्यामुळे सोशल मीडियावरील कुठलीही चॅलेंज स्वीकारण्याआधी  विचार करा असे आवाहन पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून केले.

आपण सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोमुळे त्याचा गैरवापर होणार नाही. याची काळजी घेतली पाहीजे. या अगोदर फोटो मॉर्फ करून त्याचा गैरवापर झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे असे फोटो ठेवू नका

 - जयराम पायगुडे, सायबर क्राइम पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com