अवतरलाय इंटरनेट युगाचा "रावण' 

अवतरलाय इंटरनेट युगाचा "रावण' 

पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्‌सऍप, फेसबुक हे "स्टेट्‌स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्‌सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि शहर वूमन्स सोशल वेल्फेअर असोसिएशनतर्फे चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात "सायबर क्राइम' विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा बोलत होते. वेलफेअरच्या अध्यक्षा गिरिजा कुदळे उपस्थित होत्या. 

डॉ. डिकोस्टा म्हणाले, ""इंटरनेटमुळे काम सोपे झाले असले तरी जागरूक राहणे आवश्‍यक आहे. नाहीतर जगणे कठीण होऊन बसेल. इंटरनेटचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेतली, तर होणारी फसवणूक टाळता येते. थोड्याशा बेफिकिरीमुळे सायबर गुन्हा घडतोय. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्‍लीलता त्यासंबंधी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारीची माहिती मिळवणे, तसेच त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे ठरत आहे.'' 

हॅकर्सकडून फसवणूक 
- बॅंकांमधील खातेदारांची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे 
- राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची व गोपनीय माहिती चोरणे 
- एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे 

असे राहा सतर्क 
- ट्रू कॉलर, व्हॉट्‌सऍप, फेसबुकचा वापर टाळा 
- मुलींनी फेसबुकवर खासगी माहिती व फोटो टाकू नये 
- बोगस मेल ओळखता आले पाहिजेत 
- अनोळखी व्यक्तींना मेल आयडी देऊ नका, त्यांच्याशी चॅट करू नका 
- लहान मुलांना मोबाईल हाताळायला देऊ नका 
- घरांच्या व्यतिरिक्त मोबाईल, लॅपटॉप, टॅब गिफ्ट घेऊ नका 

हे करणे आवश्‍यक 
- शाळांमध्ये सायबर क्राइमविषयक माहिती देणे आवश्‍यक 
- सायबर लॉ बदलणे आवश्‍यक 
- 70 टक्के एटीएम कार्ड सुरक्षित आहेत 
- एटीएम कार्डमध्ये इएनव्ही चिप असणे आवश्‍यक 
- व्हॉट्‌सऍप ग्रुपची तपासणी करावी 

जगात केवळ 13 रुट सर्व्हिस 
भारतात डिजिटल इकॉनॉमी येऊ पाहतेय. मात्र, त्यासाठी आवश्‍यक "रुट सर्व्हर सिस्टिम' आपल्या देशात नसल्याने भविष्यात आर्थिक फसवणुकीच्या घटना घडू शकतात. जगात केवळ 13 रुट सर्व्हिस आहेत, त्यापैकी 10 अमेरिकेत, 1 स्वीडन, एक नेदरलॅंड्‌स आणि एक जपानमध्ये आहे. कुठलीही टेक्‍नॉलॉजी 100 टक्के परिपूर्ण नसते. त्यामुळे आवश्‍यक जनजागृती व टेक्‍नॉलॉजी बदलल्यावरच ही योजना आपल्याकडे यशस्वी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com