सायबर पोलिस ठाणेच ऑफलाइन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात खास सायबर पोलिस ठाणे सुरू होऊन तीन महिने उलटूनही या ठाण्याचा कारभार ऑफलाइनच आहे. येथे ‘सीसीटीएनएस’ ही प्रणाली नसल्याने वहीमध्ये फिर्याद लिहून घेण्याची नामुष्की पोलिसांवर येत आहे. 

पुणे - शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात खास सायबर पोलिस ठाणे सुरू होऊन तीन महिने उलटूनही या ठाण्याचा कारभार ऑफलाइनच आहे. येथे ‘सीसीटीएनएस’ ही प्रणाली नसल्याने वहीमध्ये फिर्याद लिहून घेण्याची नामुष्की पोलिसांवर येत आहे. 

‘आयटी सिटी’ अशी पुण्याची ओळख असली तरी ओटीपी शेअर, ओएलएक्‍स, कार्ड क्‍लोनिंग, ई-मेल हॅकिंग, सोशल नेटवर्किंग साइटवर बदनामीसह बिटकॉइन, कॉसमॉस बॅंक असे गुन्हेही पुण्यात घडले आहेत.

‘सीसीटीएनएस’ म्हणजे काय? 
‘सीसीटीएनएस’ म्हणजे ‘क्राइम अँड क्रिमिलन्स ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम’. याची सुरवात २०१५ मध्ये झाली. इंटरनेट कनेक्‍टीव्हिटी आली आहे. यामुळे गुन्हा हा ऑनलाइन दाखल होतोच, पण अनोळखी मृतदेह, हरवलेल्या व्यक्ती, रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांची सर्व माहिती त्यावरून मिळते. तसेच गुन्ह्यांचा तपास आणि प्रतिबंध करण्यासाठी माहितीचा पोलिसांना उपयोग करता येतो. 

सायबर पोलिस ठाण्यासाठी केंद्र व राज्याकडून ‘सीसीटीएनएस’चा क्रमांक मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ‘सीसीटीएनएस’ प्रणालीमध्ये गुन्हे दाखल केले जातील.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

दृष्टिक्षेपात ठाणे 
  पोलिस निरीक्षक - ५
  सहायक निरीक्षक - १२ 
  कर्मचारी - ४६
  जानेवारी २०१९ पासूनच्या     तक्रारी - ५५०० 
  फसवणुकीची रक्कम  -     ७७ कोटी रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber police station offline