आता सायकलही मिळणार हप्त्यांवर!

मिलिंद संगई
शनिवार, 30 जून 2018

बारामती (पुणे) : काळ बदलतो तशी अनेक समीकरणेही बदलत जातात... अनेक गोष्टी शहरी वातावरणातून ग्रामीण वातावरणात आता वेगाने येतात. बदलत्या काळासोबतच आता बारामती हे हळुहळू सायकलींचे शहर बनू पाहत आहे. इतर वस्तूंसोबतच आता बारामतीकर सायकल देखील सुलभ हप्त्यांवर घेऊ शकणार आहेत, हा बदलत्या काळाचा महिमाच म्हणावा लागेल. 

गेले अनेक वर्षे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इतकच काय तर मोबाईलही सुलभ हप्त्यांवर मिळत होते. मात्र बारामतीसारख्या शहरात सायकलचा वाढणारा वापर पाहून एका नामांकीत वित्तीय संस्थेने सायकल देखील तुम्ही सुलभ हप्त्यांवर घेऊ शकला अशी योजना कार्यान्वित केली आहे. 

एकीकडे पेट्रोल डिझेलच्या सातत्याने गगनाला भिडणा-या किंमती व दुसरीकडे अनेकांनी फिटनेससाठी सुरु केलेले सायकलींग या पार्श्वभूमीवर बदलत्या काळाची पावले ओळखत संबंधित वित्तीय संस्थेने सायकलसाठी सुलभ हप्त्यांची योजना सुरु केली आहे. 

तीन हजारांपासून ते थेट पन्नास हजारांपर्यंतच्या सायकली आज बाजारात उपलब्ध आहेत. शालेय विद्यार्थी दहा हजारांवरील सायकलींशिवाय हल्ली सायकली वापरत नसल्याने पालकांनाही एकदम इतके पैसे देणे काहीसे कठीण होते, ही बाब विचारात घेऊन सुलभ हप्त्यांवर सायकली उपलब्ध करुन देण्याची ही योजना बारामतीत सुरु झाली आहे. महिना छोटया रकमेचा हप्ता सर्वांनाच परवडू शकत असल्याने आता सायकलचा खप व पर्यायाने सायकलचा वापर अधिक वाढेल असा अंदाज येथील सायकल विक्रेत्यांनी बोलून दाखविला आहे. 
 
Web Title: by cycle on EMI