बारामतीत उद्या सायकल रॅली; एक पाऊल प्लॅस्टिकमुक्तीकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

बारामती शहर : पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. 28) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून संध्याकाळी पाच वाजता ही रॅली निघणार आहे. 

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय नुकताच घेतला आहे. भावी पिढीला प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी जीवन लाभावे, या उद्देशाने 'सकाळ'ने ही रॅली आयोजित केली आहे. 

नगरपालिकेसह बारामती सायकल क्‍लब, बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना, रोटरी क्‍लब ऑफ बारामती यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना या रॅलीत सहभागी होणार आहेत. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा समाजातील सर्वच घटकांनी या सायकल रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन 'सकाळ'च्या वतीने करण्यात आले आहे. 

ही रॅली भिगवण चौकातून इंदापूर व गुनवडी चौकमार्गे, सिद्धेश्वर गल्ली, गोकुळवाडी, कोष्टी गल्ली, तांदूळवाडी वेस चौकमार्गे मारवाड पेठेतून राजस्थान दुकानापासून वळून श्रीराम गल्लीमार्गे खाटीक गल्लीतून सुभाष चौकमार्गे पुन्हा शारदा प्रांगणात येईल. या मार्गावर सिद्धेश्वर गल्ली व श्रीमंत आबा गणपतीसमोर नागरिकांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. 

पर्यावरण बचावासह इंधन बचतीचा संदेश या रॅलीच्या निमित्ताने दिला जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रांतील पदाधिकारी या रॅलीत सहभागी होणार आहेत. बारामतीकरांनीही यात सहभागी होऊन प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश सर्वांपर्यंत पोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Cycle Rally in Baramati on Monday