esakal | Video - पुण्याजवळ दुकानाला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

warje fire

सायकल दुकानाला संध्याकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली होती. दुकाने बंद झाल्याने सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

Video - पुण्याजवळ दुकानाला भीषण आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी, ता.३० : शिवणे उत्तमनगर येथील सायकल दुकानाला संध्याकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली होती. दुकाने बंद झाल्याने सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल वेळात पोचल्याने आग विझविण्यात आली. 

याबाबत, अहिरा गेट येथील धर्मवीर मित्र मंडळा जवळील चंद्रस्मृती अपार्टमेंट मधील न्यू राजस्थान सायकल मार्ट दुकानास पाउणे आठ वाजता आग लागली होती. 350- 400 स्केअर फूट दुकान आहे. दुकान मालक सवाराम ओकाराम चौधरी याच्या माहितीनुसार अंदाजे सात- आठ लाखाचे नुकसान झाले असावे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी दिली. 

दुकानात लहान मोठ्या 50 नवीन सायकली होत्या. सायकलचे पार्ट, सायकल दुचाकीचे टायर, ट्यूब होते त्यामुळे, आग जास्त भडकली. सायकल दुकान एका बाजूला हनुमान ज्वेलर्स, व दुसऱ्या बाजूला केश कर्तनालाय अशी दुकाने होती. त्या जवळून महावितरण ची वाहिनी गेल्याने आगीची भडकण्याची शक्यता होती.

वाचा महत्वाची बातमी : पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल

पोलिस नाईक सी.एम.मिसाळ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. फोटो काढणाऱ्या नागरिकांना बाजूला केले रस्त्यावरील वाहतूक एकेरी केली. या इमारतीत दुकांनाच्या वरच्या मजल्यावर खासगी शाळा आहे. वर आणि शेजारील दुकानाकडे आग सरकत होती. सात वाजता दुकान बंद केले होते. त्यामुळे कोणी जखमी झाले नाही.

पीएमआरडीए व पालिकेची सिंहगड रस्त्यावरील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यानी आग विझविली. पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर, उत्तमनगर बँकेचे अध्यक्ष सुरेश गुजर, प्रहार संघटनेचे शिवणे- उत्तमनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग राडकर अन्य व्यापारी घटनास्थळी धावून आले.