#GreenPune आयटीयन्सची ‘सायकल टू वर्क’ चळवळ

Cycle to Work movement in pune for green pune
Cycle to Work movement in pune for green pune

पुणे - एके काळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख होती; पण ती केव्हाच मागे पडली आहे. सायकलींची जागा गाड्यांनी घेतली आहे. त्यामुळे शहरात प्रदूषणही त्याच पटीने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील ३६० आयटीयन्सच्या ग्रुपने आठवड्यातील एक दिवस ‘सायकल टू वर्क’ या उपक्रमाद्वारे प्रदूषण रोखण्याची चळवळ उभी केली आहे. 

एके काळचे सायकलींचे शहर बघता बघता दुचाकी आणि मोटारींवर विराजमान झाले. जवळपास ५० लाख लोकसंख्येच्या शहरातील रस्त्यांवर तितकीच वाहने आली. मग वाहतूक कोंडी वाढू लागली आणि पर्यावरणावरही त्याचा ताण आला. 

आयटी अभियंता अभिजित कुपटे यांनी सुरू केलेल्या ‘सायकल टू वर्क’ या उपक्रमाला तब्बल ३६० अभियंत्यांनी साथ देत ग्रुप स्थापन केला आहे. या उपक्रमाला आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या चळवळीबाबत कुपटे म्हणाले, ‘‘पुण्यातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदूषणावर सायकल हा एक चांगला उपाय वाटला. याची सुरुवात मी माझ्या बायकोला सायकल भेट देऊन केली. हळूहळू मित्रांनाही त्याची जाणीव करून दिली. आमच्या ग्रुपमध्ये कात्रज, कोथरूड, बाणेर, हडपसर, शिवणे, भोसरी, रावेत, निगडी आयटीयन्स आहेत. यात ३० महिलाही आहेत. आठवड्यातील कोणताही एक दिवस आम्ही सर्वजण सायकलने आपापल्या कामाच्या ठिकाणी जातो.’’

‘सायकल टू वर्क’ या उपक्रमाला यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत. सदस्यांचा आकडा वाढत असल्याने जानेवारी २०२०मध्ये सायकल नावाचे पोर्टल काढायचे ठरविले आहे. 
-अभिजित कुपटे, आयटी अभियंता

सायकलींचे महत्त्व अनेकांना पटत आहे. बॅटरीवरील सायकलीही मिळू लागल्या आहेत. दमछाक होईल का, अशी शंका असणाऱ्यांनी या सायकलीपासून सुरुवात करावी.  
-हर्षद अभ्यंकर,  सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट

सायकल चालविणाऱ्या महिला कमी आहेत. महिलांनीसुद्धा सायकलचा वापर करावा. मी रोज कार्यालयाला जाण्यासाठी सुमारे १४ किलोमीटर प्रवास सायकलनेच करते. 
- सोनल राजभोज

पर्यावरण वाचविण्याचा संदेश 

ग्रुपमधील अनेक सदस्यांनी पुणे ते कन्याकुमारी हा बारा दिवसांचा प्रवास सायकलने केला आहे. नागरिकांनी किमान आठवड्यातून एकदातरी सायकल वापरावी; जेणेकरून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करता येईल. हा संदेश ग्रुपच्या वतीने देण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com