वाघोली - वाघोली येथील चार तरुणांनी सलग सायकल चालवत पुणे ते गोवा हे 643 किलोमीटरचे अंतर 25 तासात पूर्ण करीत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविले. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश होता. डॉ राहुल शिंदे, डॉ विनोद शेलार, राजाराम शिंदे व बीपीन उंद्रे हे यामध्ये सहभागी झाले होते.
"इन्सपायर इंडिया", या संस्थेच्या वतीने "डेक्कन क्लिफहँगर अल्ट्रा सायकल रेस दरवर्षी ", आयोजित केली जाते. या रेस मध्ये 200 जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये या चार तरुणांच्या टीमचा समावेश होता. " फ्युरिअस - 4 " असे नाव या टीमला नाव देण्यात आले होते. पुण्यातील भुगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्स पासून सकाळी आठ वाजता या रेसला सुरुवात झाली. कात्रज घाट, खंबाटकी घाट, पसरणी घाट असे विविध घाट, नागमोडणी रस्ते, वळणे, रात्रीचा सलग प्रवास असे अनेक अडथळे पार करीत ही टीम गोव्यातील बोगमालो बीचवर दुसऱ्या दिवशी नऊ वाजता पोहचली. 31 तासांची मुदत असताना 25 तासात हे अंतर पार करून त्यांनी पहिल्या 10 क्रमांकात स्थान मिळविले. त्यांच्या मदतीला चार जणांची डॉक्टरांची मदतनीस टीम होती. यामध्ये डॉ शिवाजी नरवडे, डॉ शंकर वावरे, डॉ संजय शिंदे आणि डॉ राजेंद्र खेत्रे यांचा समावेश होता.
डेक्कन क्लिफहँगर ही एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अल्ट्रा सायकल रेस असून यंदाचे हे आयोजनाचे सहावे वर्ष होते. सोलो पद्धतीने ठराविक वेळेत पूर्ण केल्यास पूर्ण करणारा जगातील सर्वात कठीण अशा समजल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेस पात्र ठरतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.