सायकल स्पर्धकांचे नीरा बारामती मार्गावर स्वागत

चिंतामणी क्षीरसागर
शनिवार, 21 जुलै 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचे नीरा बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक येथे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले.

वडगाव निंबाळकर (पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचे नीरा बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक येथे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले.

शनिवारी बहुतांशी शाळांना दुपारपर्यंत आर्धवेळ शाळा असते. सुट्टीची वेळ झाली असतानाही विद्यार्थी सायकल स्पर्धा पहाण्यासाठी मोठ्या उत्सहात रस्त्याच्या कडेला गर्दी करून उभा होते. आलेल्या स्पर्धकांना टाळ्या वाजवुन प्रोत्साहन देत होते. यामधे गावातील पदाधिकारी ग्रामस्थ व महिलाही सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत जिल्हा स्तरीय 3500 राज्यस्तरीय 243 राष्ट्रीय स्तरावरील 119 आंतरराष्ट्रीय स्तरावरील 27 स्पर्धकांचा सहभाग होता. बारा वाजून पाच मिनीटानी सायकलस्वार स्पर्धक होळ येथे दाखल झाले. येथील आनंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्पर्धकांचे स्वागत केले.

यावेळी आनंद संस्थेचे सचिव प्रमोदकुमार गिते, सोमेश्र्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धार्थ गिते, दिपक होळकर, जमिर शेख, एकनाथ होळकर, बाळासाहेब कदम, दत्तात्रेय वायाळ, अस्लमभाई इनामदार, मुख्याध्यापक एस पी नरळे. उपस्थीत होते. वाढदिवसानिमित्त सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाउवाटप व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्याचे वाटप करण्यात आले. वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेसमोर स्पर्धकांना प्रोत्साहीत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. ढोल ताशांच्या गजरात स्पर्धकांचे स्वागत झाले. मुख्याध्यापक लालासो दरेकर, क्रिडा शिक्षक सिएम जाधव, दत्तात्रेय खोमणे, अतुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते. कोऱ्हाळे बुद्रुक येथे सिद्धेश्र्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पंचायत समिती सदस्य प्रदिप धापटे, सोमेश्र्वर कारखान्याचे उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे, दिपक खोमणे, डॉ. नंदकुमार यादव, सुनिल खलाटे स्वागतासाठी उपस्थीत होते.

Web Title: cyclist welcome on neera baramati road