‘वायू’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र; कोकण, मुंबईत सर्तकतेचा इशारा 

download.jpg
download.jpg

पुणे (प्रतिनिधी) : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना, समुद्र खवळून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टी, मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता वायू चक्रीवादळ गोव्यापासून नैर्ऋत्येला ३५० किलोमीटर, मुंबईपासून नैर्ऋत्येकडे ५१०, तर गुजरातच्या वेरावळपासून ६५० किलोमीटर दक्षिणेकडे हे वादळ घोंगावत होते. मंगळवारी रात्री उशिरा या वादळाचे तीव्र वादळात रूपांतर होईल, ताशी ११५ ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेल्या वादळामुळे गुरुवारपर्यंत (ता. १३) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे, उंच लाटा, मुसळधार पाऊस पडणार असल्याने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गुरुवारी (ता. १३) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. वादळामुळे घरांची पडझड होणे, वीज आणि संदेशवहन यंत्रणा बंद पडणे, पूर येणे, झाडे, झाडाच्या फांद्या पडणे, केळी, पपई या पिकांसह किनारपट्टीय भागात असलेल्या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी पूर्णपणे थांबवणे, किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर करणे, घराबाहेर न पडणे यांसह सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com