मानवी चुकांमुळेच सिलिंडरचे स्फोट

Cylinder-Blast
Cylinder-Blast

पुणे - गुरुवार पेठेतील इमारतीमधील सदनिकेत ३० एप्रिलला स्वयंपाक सुरू असतानाच दुसरा गॅस जोडण्याचा प्रयत्न घरातील व्यक्तींनी केला. त्यामुळे गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले होते. फेब्रुवारीत वडापाव-सामोसा विक्रेत्याचा कामगार पहाटे शेगडी पेटविताना गॅसगळती झाली. आगीत चौघे गंभीर जखमी झाले. अशा प्रकारे गॅसगळतीतून होणाऱ्या सिलिंडर स्फोटाच्या घटना मानवी चुकांमुळेच घडत आहेत. पाच वर्षांत शहरात १८२०, तर चार महिन्यांत २६ गॅसगळतीच्या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत.

गॅसगळतीच्या घटना या मानवी चुकांमुळेच होतात, असे अग्निशमन दलाच्या निरीक्षणात स्पष्ट झाले. सिलिंडर घेणे, शेगडी चालू करण्यापासून रेग्युलेटर, रेग्युलेटर व शेगडीला जोडला जाणारा पाइप, स्टार्टरची पाहणी केली जात नाही. शेगडीची सतत हालचाल केल्यापासून ते सिलिंडर बदलण्यापर्यंतचा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. पण, नागरिकांचे दुर्लक्ष होते. परिणामी, गॅसगळतीमुळे सिलिंडरचा स्फोट, आगीच्या घटना घडत आहेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय काळजी घेता येईल? 
  सिलिंडर घेताना पाहणी करावी
  चांगल्या दर्जाचा लायटर वापरणे
  रात्री शेगडी व रेग्युलेटरचे बटन बंद करावे
  आग लागल्यास पाण्याने भिजलेले पोते, ब्लॅंकेट टाकावे
  दरवाजे, खिडक्‍या खुल्या करून हवा खेळती ठेवणे
  गॅसगळती झाल्यास अग्निशमन दलाशी संपर्क करणे 

‘ऑटोकट’मुळे टळतात दुर्घटना
मोठ्या सोसायट्यांत सर्वांचे सिलिंडर एकत्र ठेवून तेथूनच पाइपद्वारे गॅसपुरवठा होतो. ‘ऑटोकट सिस्टिम’ असते. त्यामुळे गॅसगळती झाल्यास गॅसपुरवठा बंद होतो. परिणामी, मोठी दुर्घटना टळते.

गॅसगळतीच्या ८० ते ९० टक्के घटना मानवी चुकांमुळेच होतात, असे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. उर्वरित ५ ते १० टक्के तांत्रिक त्रुटींमुळे गॅसगळती होते. गॅस पेटविताना होणारे दुर्लक्ष, खराब स्टार्टर वापरणे, यामुळे या घटना घटतात. खबरदारी न घेतल्यास गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊन नागरिक गंभीर जखमी ते एखाद्याचा जीवही जातो. नागरिकांनीच खबरदारी घेतली पाहिजे.
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशमन दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com