PuneRains : पुण्यात पुन्हा धुवाधार पाऊस; सेटटॉप बॉक्सही पडले बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस याचा फटका "डीटूएच'सेवेलाही बसला. शहराच्या अनेक भागातील ही मनोरंजनाची सेवा ठप्प पडली. तर, वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असल्याचे चित्र होते.

पुणे : विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस याचा फटका "डीटूएच'सेवेलाही बसला. शहराच्या अनेक भागातील ही मनोरंजनाची सेवा ठप्प पडली. तर, वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असल्याचे चित्र होते.

Image may contain: outdoor

पुणे शहरात पुन्हा धुवाधार पाऊस झाला. रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे वेगाने वाहणारे लोट दिसून येत आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागला.

पडणाऱ्या या पावसाचा फटका शहरातील खवय्यांनाही बसला. वेगवेगळ्या ऍपवरून खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. अनेक कंपन्यांना ही सेवा घरपोच देणे शक्‍य होत नसल्याचे सांगत "ऑर्डर' रद्द केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D2H service are failed due to heavy rain in pune