पिंपरी : महापालिकेच्या शाळेला सेमी इंग्रजी वर्गांना मिळेना डीएड शिक्षक 

DAD teacher are not available for Semi classes in Pimpri chinchwad municipal School
DAD teacher are not available for Semi classes in Pimpri chinchwad municipal School

पिंपरी : "आमच्या शाळेत प्रशस्त इमारत अन्‌ सेमी इंग्रजीतून शिक्षण मिळेल, अशा प्रकारे महापालिका शाळांनी मार्केटिंग फंडा अवलंबिला. मात्र प्रत्यक्षात नियोजनशून्य कारभारामुळे बहुतांशी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग बंद आहेत. निम्मे वर्ष सरले तरी अनेक सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सायन्स डी. एड. झालेले शिक्षक अद्यापही कार्यरत नसल्याची माहिती समोर आली आहे. 

महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

महापालिका शाळांची पटसंख्या वर्षागणिक घटत आहे. यावर उपाय म्हणून "सेमी इंग्रजी'चे वर्ग सुरू केले. परंतु वर्ग आणि सायन्स डीएड शिक्षकांचे समीकरण चुकल्यामुळे सद्यःस्थितीत 34 शाळांमध्ये पदवीधर शिक्षक शिकवायला नसल्याची वस्तुस्थिती आहे. या वर्गांसाठी इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून सायन्स डी.एड झालेल्या शिक्षकांची गरज असते. या वर्गांसाठी कंत्राटपद्धतीने सायन्स डी.एड शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश घेणारी मुले त्यापूर्वी किमान तीन वर्षे (प्ले ग्रुप, लोअर के जी, अप्पर के जी) इंग्रजी भाषा शिकलेली असतात. याउलट महापालिकेतील शाळेत अशा पद्धतीने सेमी इंग्रजीतून शिक्षण मिळत असेल, तर महापालिकेतील मुले कशी इंग्रजी शिकणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. 

धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न 
महापालिका शाळांवर "पवित्र प्रणाली' 94 शिक्षकांची भरती झाली. पण त्यात केवळ आठच पदवीधर शिक्षकांची नियुक्ती झाल्याने सेमीच्या उर्वरित वर्ग सायन्स डी.एड शिक्षकाविनाच आहेत. सध्या विज्ञान पदवीधर 5 शिक्षक कार्यरत आहेत. मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडून सेमी वर्गाचा अभ्यास शिकविण्यात अडचणी येत आहेत. अजूनही पदवीधर शिक्षकांची गरज असल्याचे पर्यवेक्षकांची माहिती आहे. 

पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग... 
सेमी पात्र शाळा 
जाधववाडी कन्या आणि जाधववाडी मुले या दोन प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. सात शाळांमध्ये फक्त इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग सेमी इंग्रजीतून भरतात. खिंवसरा पाटील शाळेत सहावी वर्ग तर वाकड मुले क्र.57/1मध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांना सेमीतून शिकवण्यात येते. कस्पटेवस्ती क्र. 59 मध्ये 35 मुलांचा पहिलीचा वर्ग भरतो. भूमकरवस्ती कन्या क्र. 104 मध्ये दुसरीचा वर्ग, यशवंतनगर शाळेत दुसरीचा तर खराळवाडी शाळेत पाचवी व सहावीला शिकविले जाते. 

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

उरल्या फक्‍त 34 
शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी सन 2008 मध्ये महापालिकेच्या 90 शाळांमध्ये "पाचवीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग' सुरू केले. परंतु शिक्षकांच्या उदासीनतेमुळे 87 शाळांमधील सेमीचे वर्ग वर्षभरात बंद पडले. त्यानंतर पुन्हा माजी सभापती फजल शेख यांनी 2012 मध्ये 80 महापालिका शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीसाठी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले. त्यापैकी केवळ 34 शाळांमध्ये आधल्या-मधल्या वर्गांना "सेमी'तून शिकवले जाते. मोहननगरमधील शाळेतून सेमीसाठी मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार खुद्द मुख्याध्यापिकेने केली आहे. 

"रिलायन्सवर गुन्हा दाखल करण्याची या काॅंग्रेस आमदाराची मागणी

आकडे बोलतात 
शाळा - 34 
सेमी विद्यार्थी संख्या - 2 हजार 
शिक्षक - 34 ते 37 
रिक्त - 100 (सायन्स डि.एड) 
पवित्रतून मिळाले - 8 शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com