बहीण-भावाच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट

उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे.
उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे.

पुणे - नवरा-बायकोच्या नात्याची अनेक नाटकं रंगमंचावर आली. आता बहीण-भावाच्या पवित्र नात्याची गोष्ट सांगणारी कलाकृती रंगमचावर आली आहे. या नाटकाची लेखिका आणि नायिका प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहेत. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ही ‘गुड न्यूज’ आहे... यात प्रिया अभिनय नव्हे; तर निर्मातीच्या भूमिकेत आहे. ‘दादा, एक गूड न्यूज आहे’, असे या नाटकाचे नाव आहे. 

ऋता दुर्गुळे या नाटकाची नायिका आहे. तिच्यासह कल्याणी पाठारेदेखील प्रथमच व्यावसायिक नाट्यलेखन करीत आहे. अद्वैत दादरकर हे दिग्दर्शक असून, जयंत घाटे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्याही भूमिका आहेत. 
अभिनेता उमेश कामत म्हणाला, ‘‘महाविद्यालयीन तरुणी आणि तिचा दहा वर्षे मोठा भाऊ यांच्या नात्याची ही हलकीफुलकी गोष्ट आहे. आजच्या पिढीचा विचार मांडणारे हे नाटक आहे.’’

पाठारे म्हणाल्या, ‘‘या कथेला एक ठाम भूमिका आहे; पण त्याचा थाट प्रवचनात्मक किंवा प्रचारकी नाही. पात्रे आजची असल्याने त्यांची भाषाही आजची आहे.’’ 

प्रिया म्हणाली, ‘‘नाटकाची कल्पना ते सादरीकरण हा प्रवास निर्माती म्हणून अनुभवला. यातून खूप शिकायला मिळाले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com