सुयश टिळकला दादा कोंडके पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता - अभिनेता सुयश टिळक याला ‘दादा कोंडके पुरस्कार’ प्रदान करताना डॉ. अनिल अवचट. या वेळी मनोहर कोलते यांच्यासह अन्य मान्यवर.
महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता - अभिनेता सुयश टिळक याला ‘दादा कोंडके पुरस्कार’ प्रदान करताना डॉ. अनिल अवचट. या वेळी मनोहर कोलते यांच्यासह अन्य मान्यवर.

पुणे - ‘‘अलीकडे माणसांमध्ये स्वार्थी वृत्ती वाढत आहे. यात बदल होऊन सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. आज समाज विखुरला जाऊ लागल्याने हिंसाचारात वाढ होत आहे,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनच्या वतीने अभिनेता सुयश टिळक याला दादा कोंडके समाजभूषण  पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. अवचट बोलत होते. ‘सकाळ’चे संपादकीय सल्लागार मल्हार अरणकल्ले, मनोहर कोलते आदी उपस्थित होते. कोलते यांनी लिहिलेल्या ‘मनोहारी विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. सिंहगडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या अनिल कांबळे या जखमी गिर्यारोहकाला जीवनदान दिल्याबद्घल आतकरवाडी गावातील जय भवानी मंडळाचे कार्याध्यक्ष पांडुरंग सुपेकर, किसन पढेर आदींचा या वेळी सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com