Asha Parekh : आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; हिंदू महासंघाचा विरोध

Anand dave
Anand davesakal

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख यांना मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार काम पाहून का आडनाव पाहून दिला? असा सवाल हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी केला आहे.

(Asha Parekh Latest News)

चित्रपटात कामे करणे आणि चित्रपट सृष्टीसाठी योगदान देणे यात काही फरक नाही का? असा सवाल हिंदू महासंघाने उपस्थितीत केला आहे. गुजरातच्या येणाऱ्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील "गुज-राज" च वर्चस्व यांच्या समाधानासाठीच हा निर्णय घेतला असावा असा दावा आनंद दवे यांनी केला आहे.

Anand dave
PFI Row : कोरोनाकाळात पुणे महापालिकेने घेतली होती PFIची मदत; झाला होता करार

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2022 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 60-70 च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com