दादासाहेब फाळके यांचा स्टुडिओ गोध्रात ! 

dadasaheb-pahlke
dadasaheb-pahlke

पुणे  - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना 1900 मध्ये पणजोबांनी फोटो स्टुडिओला जागा दिली होती. त्यांनी भाडे नाकारून काही कार्यक्रम असल्यास कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र काढण्याची अट टाकली होती. ही दुर्मीळ छायाचित्रे 2012 मध्ये मिळाल्यानंतर ही गोष्ट समोर आल्याची माहिती चित्रपट समीक्षक ध्वनी देसाई यांनी दिली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित नवव्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी चित्रपट समीक्षक समर नखाते, मकरंद दंभारे, क्रांती कानडे, माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेड्डी, विश्राम ढोले, डॉ. अजित गागरे, अजय सोनावणे, पारूल शर्मा उपस्थित होते. 

देसाई म्हणाल्या, ""दादासाहेब फाळके 1900 मध्ये गोध्रा येथे होते. त्या वेळी त्यांना फोटो स्टुडिओसाठी जागा हवी होती. त्यांना कोणी तरी देसाई कुटुंब कलेचे उपासक असून ते जागा देतील, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी पणजोबांना भेटून काही छायाचित्रे दाखवून फोटो स्टुडिओसाठी जागेची मागणी केली. पणजोबांना त्यांची छायाचित्रे खूप आवडली होती. याबाबत अनभिज्ञ होतो. मात्र, 2012 मध्ये फाळके यांच्या नातेवाइकाने दुर्मीळ छायाचित्रांचा अल्बम दिला. अशा महान व्यक्तीचा सहवास देसाई कुटुंबाला लाभल्याचे भाग्य समजतो.'' 

कानडे म्हणाले, ""मराठी लघुपटातील शीर्षक, पतनामावली (क्रेडिटस्कोर) आणि संगीत पाश्‍चिमात्य हा विरोधाभास वाटतो. निर्मात्यांनी केवळ लघुपट स्पर्धांना पाठविण्याची घाई करू नये. नरेंद्र दाभोलकर, शहरातील नद्यांची अवस्था, शहर, राज्य व देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारे अनेक विषय आहेत. त्यावर लघुपट बनवा, त्याची गरज समाजाला आहे.'' 

पुढच्या वर्षीचा दहावा लघुपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. ते म्हणाले. महोत्सवात दोन जगातील कवी, ग्रे, नूर इस्लाम, लाईक शेअर सबक्राईब, अरेबियन नाईट या लघुपटांना पुरस्कार दिला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com